बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील भाजप आमदाराचा प्रताप; महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

पुणे | पुण्यातील एका भाजप आमदाराची आॅडिओ क्लिप सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या आॅडियओ क्लिपमध्ये भाजप आमदारानं एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केली आहे. या आॅडिओ क्लिपनं सध्या एकच खळबळ माजवली आहे.

व्हायरल होणारी ही आॅडिओ क्लिप राज्याच्या माजी सामाजिक न्यायमंत्र्यांच्या आमदार भावाची असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. या क्लिपमध्ये भाजप आमदार अतिशय गलिच्छ भाषेत बोलताना ऐकू येत आहे. ही क्लीप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

पुणे महापालिकेतील कामाच्या लॉकिंग बिलासंदर्भात आमदारांनी महिला अधिकाऱ्याला फोन केला होता. बिलं काढता की नाही, काय करता ते सांगा? नाहीतर तुमच्याकडे बघून घेतो, असं म्हणत महिला अधिकाऱ्याला आमदारांनी धमकाविण्याचा प्रयत्न केला आहे. किती वेळा त्यानं तुमच्याकडे यायचं, काम होणार आहे की नाही, नसेल तर तसं सांगा, मी बघतो मग काय करायचं?, असं आमदार रागात महिला अधिकाऱ्याला म्हणत आहे.

दरम्यान, यावर महिला अधिकारी तुम्ही आमच्या साहेबांना फोन करा, असं सांगतात. त्यावर मी काय तुमचा नोकर आहे का?, तुम्ही तुमच्या साहेबाला फोन करा, आणि मला परत 10 मिनिटांत फोन करा, असं आमदारांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या –  

“हॅरीस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात मग सोनिया गांधी पंतप्रधान का बनू शकत नाहीत?”

भारतातील सशक्त लोकाशाहीमुळे एक चहा विकणारा चौथ्यांदा आमसभेत भाषण देतोय- नरेंद्र मोदी

“72 तासांत खिशातून सटकलेले अजित पवार भाजपला कसे झेपणार?”

पुढील तीन-चार दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

‘कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यायचा विसरला असला तर…’, आरोग्य तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More