बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लफडी करताना मला विचारलं होतं का?”; नवनीत राणांची ऑडिओ क्लिप व्हायरल

अमरावती | आपल्या आक्रमक शैलीनं राज्यासह देशाच्या राजकारणात गाजणाऱ्या खासदारांमध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं नाव येतं. नवनीत राणा यांनी अनेक वेळा आक्रमकपणे ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मात्र सध्या नवनीत राणा यांचा आक्रमकपणा त्यांच्या अंगलट येण्याची चिन्ह आहेत. नवनीत राणा यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे.

नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवि राणा हे युवा स्वाभिमान पार्टी चालवतात. या पार्टीच्या माध्यमातून राणा दाम्पत्यानं राजकारणात आपली ओळख निर्माण केली आहे. अशात मात्र त्यांच्या या पार्टीच्या एक कार्यकर्त्याविरोधात फसवणुकीची तक्रार एका महिलेनं नवनीत राणा यांना सांगितली आहे. पण तक्रारदार महिला तक्रार सांगत असताना राणा यांनी तिला उद्धट भाषेत बोलल्यानं हे प्रकरण वाढलं आहे.

तक्रारदार महिला आपल्यावरील प्रसंग सांगत असताना नवनीत राणा यांनी त्या महिलेची उलटतपासणी केली आहे. तुम्ही मला विचारून लफडं केलं का?, असा संतप्त सवाल त्या महिलेला राणा यांनी विचारला आहे. परिणामी सामान्य महिलांनी नवनीत राणा यांना समस्या सांगाव्यात की नाही, अशी चर्चा अमरावतीमध्ये रंगली आहे.

दरम्यान, नवनीत राणा या आपल्या वेगळ्या अंदाजांसाठी राजकारणात प्रसिद्ध आहेत. पण त्यांचा तक्रारदार महिलेवर ओरडण्याचा अंदाज अमरावतीकरांना पसंत येणार नाही, अशी चर्चा आहे.

थोडक्यात बातम्या – 

भाजपला सर्वात मोठा धक्का! गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा

26 जानेवारीला पथसंचलनात दिसणार महाराष्ट्राचा अनोखा चित्ररथ! पाहा फोटो

“प्रशांत किशोर काॅंग्रेसमध्ये येणार होते पण…”, प्रियंका गांधींचा सर्वात मोठा खुलासा

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

मोदींच्या मंत्र्याचा अजब कारभार! दार बंद करून केली अधिकाऱ्याला मारहाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More