कोरेगाव प्रकरणाचे पडसाद, औरंगाबादमध्ये किरकोळ तणाव

औरंगाबाद | भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद औरंगाबादच्या उस्मानपुरा भागात उमटलेले पहायला मिळाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने आता या भागात शांतता आहे. 

गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या असून शहरभर दंगल पसरल्याची अफवा दुपारी पसरली होती. मात्र नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

दरम्यान, भीमा कोरेगावमध्ये राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून परिस्थिती नियंत्रणात आहे.