Top News

अटलजींच्या श्रद्धांजलीस विरोध करणाऱ्या MIMच्या नगरसेवकाला 1 वर्षांचा तुरुंगवास

औरंगाबाद | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारा एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनला एका वर्षांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मतीनच्या वाढत्या गुन्हेगारी आणि धोकादायक कारवायांची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. 

औरंगाबाद पोलिसांनी महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए 1981) मतीनवर कारवाई केली आहे. मतीनची एका वर्षासाठी हर्सुलच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

बेकायदेशीर जमाव जमवणे, जाळपोळ करणे, मनुष्यहानी होईल असे कृत्य करणे, लोक सेवकांवर हल्ला करणे, सरकारी कामात अडथळा, दोन जमातींत तेढ निर्माण करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे मतीनवर दाखल आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-चार दिवसांनंतर ‘माझ्या नवऱ्याची बायको’त ही शनाया दिसणार नाही!

-माझं ऐकलं असतं तर दाभोलकर, पानसरेंची हत्या झाली नसती!

-निवडणुकांपुर्वी जाणूनबुजून समाजात भीतीचं वातावरण निर्माण केलं जातंय!

-कुर्बानीसाठी आणलेल्या रेड्याचा भिवंडीत धुडगूस; नागरिकांची एकच पळापळ

-पुण्यातील बेपत्ता झालेली ती दोन कुटुंब सापडली; पाहा नेमकं काय घडलं…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या