मुलीची छेड काढणाऱ्या क्लासचालकालला शिवसैनिकांकडून चोप

औरंगाबाद | मुलीची छेड काढणाऱ्या क्लासचालकासह एकाला शिवसैनिकांनी चोप दिला. शिवहरी वाघ आणि रोहित सुड अशी या दोघांची नावं आहेत. 

औरंगाबादच्या आकाशवाणी परिसरात नीट आणि जेईई परीक्षेची शिकवणी घेणाऱ्या आकाश इन्स्टिट्यूटमध्ये दोन्ही आरोपी गेल्या काही दिवसांपासून मुलीवर अश्लील शेरेबाजी करत होते.

सदर प्रकार मुलीने घरी सांगितला. त्यानंतर शिवसैनिकांनी दोघांना बेदम मारहाण करुन पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरु आहे.