बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

औरंगाबादमध्ये भाजपला मोठा धक्का!; भाजपचा ‘हा’ नेता शिवबंधन बांधणार

औरंगाबाद | औरंगाबाद महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेल्या असताना भाजपला मोठा धक्का बसणार आहे. या निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतराला उधाण आलं आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याचं समजत आहे. तनवाणी यांच्यासह भाजपचे सात ते आठ नगरसेवक फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ असं नामांतर करण्याच्या हालचालींना मुख्यमंत्र्यांकडून वेग आलेला आहे. अशातच मनसे आणि भाजपनेही निवडणुकांच्या प्रचारात हा मुद्दा उचलून धरला आहे.

दरम्यान, एप्रिल 2020 मध्ये औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना पुन्हा महाविकास आघाडीने निवडणुकांना सामोरं जाण्याच्या तयारीत आहेत.

ट्रेंडिंग बातम्या- 

इंदोरीकरांच्या वादावर सिंधूताई सपकाळ यांची मोठी प्रतिक्रिया

“मासिक पाळीत स्वयंपाक करणारी स्त्री पुढच्या जन्मी कुत्री होणार अन् खाणारा पुरूष…”

महत्वाच्या बातम्या- 

“भाजपचे लोक जसं एखादं वाक्य मुद्दाम बोलतात तसं महाराज बोलत नाहीत”

शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती खालावली, रक्तदाबाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल

“इंदोरीकर महाराजांच्याविरूद्ध गेल्या तर तृप्ती देसाईंचं तोंड काळं करू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More