दांडिया खेळायला आला नाही म्हणून प्रेयसीनं प्रियकराला भररस्त्यात चोपलं!

प्रतिकात्मक फोटो

औरंगाबाद | दांडिया खेळायला सोबत येत नाही म्हणून प्रेयसीने प्रियकराला भररस्त्यात मारहाण केली आहे. औरंगाबादमधील चिश्तिया कॉलनी चौकात हा अजब प्रकार घडला आहे.

प्रेयसी नटून-थटून आली होती. तीने प्रियकराला दांडिया खेळण्यास ये म्हणून सांगितलं. मात्र काहीतरी काम असल्याचं सांगून त्याने दांडियाला येण्यास नकार दिला. 

प्रियकराच्या नकाराने संतापलेल्या प्रेयसीने त्याला भररस्त्यातच मारहाण करण्यात सुरुवात केली. धास्तावलेल्या प्रियकरानं जवळची पोलीस चौकी गाठली. 

पोलिसांना या घटनेनं आश्चर्य वाटलं. महिला पोलिसानं प्रेयसीला बोलवून आणलं. पोलिसांनी दोघांची समजूत काढली आणि दोघांना सोबत रवाना केलं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-“अयोध्या वारीसाठी शिवसेनेला शुभेच्छा, पण…”; शिवसेना भवनाबाहेर मनसेची पोस्टरबाजी

-अमृतसर रेल्वे दुर्घटनेवरुन राजकारण; काँग्रेसवर आरोप करणारा भाजपचा प्रवक्ता

-उद्धवजी, त्यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना चिमटा

-अमिताभ बच्चन उत्तर प्रदेशमधील 850 शेतकऱ्यांचं कर्ज फेडणार!

-भाजपचा सर्वात धक्कादायक निर्णय; 100 आमदारांचं तिकीट कापणार?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या