बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठवाड्यातील नद्यांना महापुराचा धोका; मुसळधार पावसामुळे काढणीला आलेली पिकं संकटात

औरंगाबाद | राज्यात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. सध्या शेतकरी पीक काढणीच्या घाईत आहेत. त्यातच आता मराठवाड्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पावसाने गावागावात मोठं नुकसान झालं आहे. अजुनही पाऊस चालू असल्यानं नागरिकांना सतर्क रहाण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. कोणतीही हानी होवू नये याची काळजी प्रशासन घेत असल्याचं दिसतंय.

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालूक्याला पावसाचा जोरदार फटका बसला आहे. या भागातील गावात पाणी शिरलं आहे. महापुराचा धोका निर्माण झाला आहे. गावागावात शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सोयगाव भागातील शेतकऱ्यांना पिकांची चिंता लागली आहे. यंदा पाऊसकाळ जोरात आहे. मराठवाड्यातील पिकं सुद्धा चांगल्या प्रमाणात आली आहेत. पण आता काढणीच्या वेळी पावसाने हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता नदी आणि नाल्यांमध्ये पूराचा धोका वाढला आहे.

वाशिम जिल्ह्याला सुद्धा पावसाने चांगलेच झोडपलं आहे. वाशिम भागात सतत पाऊस आहे. विजांच्या कडकडाटासह पावासाने हजेरी लावली आहे. सतत पडणाऱ्या पावसाने वाशिम जिल्ह्यातील शेतीचं प्रचंड नुकसान केलं आहे. काढणीला आलेला उडीद पिकांचं मोठं नुकसान झालं. सोयाबीनला सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. परिणामी शेतकरी आता अडचणीत आला आहे.

सध्या सर्वत्र होत असलेल्या या पावसाने खरीप पिकांचं मोठ नुकसान होणार आहे. मराठवाड्यातील बहूतांश भागातील सोयाबीन काढणी चालू झाली आहे. पाऊस जर असाचं पडत राहिला तर काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

थोडक्यात बातम्या 

‘आम्ही चौकशी केली, त्यात कोणताही घोटाळा झालाच नाही’; देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले

“आमचा विश्वासघात झालाय, ‘ते’ मुख्यमंत्रिपदाच्या लायक नाहीत”

राज्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; ‘या’ भागांना अलर्ट जारी

चांगलं केलं की चांगलंच होतं, आता वेळच सर्व गोष्टींना उत्तर देईन – सोनू सूद

विराटची लाडकी कार विक्रीसाठी बाजारात, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More