औरंगाबाद महाराष्ट्र

राज्यसभा उमेदवारीत डावलल्यानंतर चंद्रकांत खैरे ‘नॉट रिचेबल’

Loading...

औरंगाबाद | राज्यसभेच्या उमेदवारीत शिवसेनेने जुन्या-जाणत्या नेत्यांना डावलून आयारामांना झुकतं माप दिल्यानं नाराजी पसरल्याचं चित्र आहे. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरेही गायब झाल्याची माहिती असून खैरे यांचा फोन ‘नॉट रिचेबल’ येत असल्याची माहिती समजत आहे.

शिवसेनेच्या कोट्यातून महाराष्ट्रातील राज्यसभा उमेदवाराची घोषणा काल दुपारी करण्यात आली. काँग्रेसमधून आलेल्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेने राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांचा कुणाशीही संपर्क नाही.

Loading...

उमेदवारी नाकारल्यामुळे चंद्रकांत खैरे नाराज असल्यचं बोललं जात आहेत खैरे यांना चक्कर आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून चंद्रकांत खैरे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र खैरे यांचे सर्वच फोन बंद असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही.

दरम्यान, मला राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण न ती मिळाल्यामुळे थोडीशी नाराजी आहे. आदित्यसाहेबांना मी खासदारकीसाठी नाही आवडलो. त्यांची त्या बाईला चॉईस होती. कारण ती खूप चांगलं हिंदी आणि इंग्रजी बोलते, अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली., असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

पोलिसांसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सर्वात मोठी घोषणा

महत्वाच्या बातम्या

Googleच्याही मुळावर कोरोना, भारतातील ऑफिस बंद!

रोहित तू काहीही काळजी करु नको आणि… ; मुख्यमंत्र्यांनी नोकर भरतीबाबत पवारांनी दिलं हे आश्वासन

सोन्याची लंका जाळायला भिभीषण आता आमच्याकडे आलाय- शिवराजसिंह चौहान

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या