बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

औरंगाबादमध्ये शेतकरी कुटुंबाला मारहाण; गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ, पाहा व्हिडिओ

औरंगाबाद | औरंगाबादच्या कन्नड तालुक्यामध्ये शेतीच्या वादातून शेतकरी कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना ही कन्नड तालुक्यातील हातनूर गावातील असल्याची माहिती समोर येत आहे.

शेतीच्या बांधाच्या वादातून महिला व पुरुषांना बेदम मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये ठिबक सिंचनाचे पाईप उपसून एक व्यक्ती मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, या प्रकरणात राजकीय दबावातून पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप पीडित शेतकरी कुटुंबाने केला आहे. तसेच महिला व पुरुषांना फरफटत नेत मारहाण होत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. तरीही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.

या प्रकरणातील पीडित कुटुंबियांच्या घरातील एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतला आहे. तसेच या घटनेला दोन दिवस उलटून गेले तरीही पोलिसांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे औरंगाबादमधील कन्नड ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या –

साखरपुडा एकीसोबत, लग्न दुसरीसोबत; जालन्यातील घटनेनं एकच खळबळ

मुलीने घरमालकाच्या मुलाला भाऊ मानून बांधली राखी, त्याच भावाने मित्रासोबत मिळून केला गँगरेप

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात पण श्रेय कुणाचं?, मुख्यमंत्र्यांचं उत्तर ऐकून अभिमान वाटेल!

शनिवारी देशातील कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, बरे हाेणाऱ्यांची संख्या नव्या रूग्णांपेक्षा 1 लाखाने अधिक

पुण्यात लग्नाचं आमिष दाखवून वर्ग मित्राकडून तरूणीवर अडीच वर्षे बलात्कार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More