Top News

काँग्रेसला मोठा झटका; विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचा विजय

औरंगाबाद | औरंगाबादमधील विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. अंबादास दानवेंनी काँग्रेसच्या बाबुराव कुलकर्णी यांचा पराभव केला आहे.

अंबादास दानवेंनी 547 मतांपैकी 523 मतं मिळवत काँग्रेसचा धुव्वा उडवला आहे. औरंगाबादमधील विधानपरिषदेच्या या जागेवर शिवसेनेचा विजय आधीपासून पक्का मानला जात होता. या विधानपरिषद निवडणुकीत 98. 50 टक्के मतदान झालं आहे.

काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी अंबादास दानवेंना पाठिंबा दिल्याने काँग्रेसच्या विजयाच्या आशा मावळल्या.परिणामी या जागेचा निकाल एकतर्फी असाचं लागला.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या पाठिंब्यामुळे माझा विजय पक्का असा, असं अंबादास दानवे यांनी निकाला आधीच म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-राजकारण फार काळ टीकत नाही; बहु भी कभी सास बनती है- बाळा नांदगावकर

-ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे- संदिप देशपांडे

-मनसे पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड; संदिप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

-राज ठाकरे आज ईडीच्या कार्यालयात; पोलिसांचा चोख बंदोबस्त

-अखेर हायव्होल्टेज ड्रामा संपला… पी. चिदंबरम यांना अटक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या