औरंगाबाद | औरंगाबादच्या जागेसाठी 14 इच्छुक उमेदवारांनी आपली नावे पक्षाला कळवली होती. यापैकी प्रा.रविंद्र बनसोड, कल्याण काळे आणि सुभाष झांबड यांची नावे सर्वाधिक चर्चेत असल्याचं कळतंय.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 26 मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची यादी तयार केली आहे. यामध्ये औरंगाबादच्या 14 पैकी 3 उमेदवारांची नावं काँग्रेसनं निश्चित केली असल्याचं समजतंय.
औरंगाबादच्या जागेसाठी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार हे देखील इच्छुक होते पण त्यांचं नाव पिछाडीवर पडल्याचं दिसतंय.
गेल्या चार निवडणुकीत या जागेवर काँग्रेसचा उमेदवार पराभूत झालेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही जागा आपल्याला मिळावी म्हणून विशेष प्रयत्न चालू आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–युती व्हावी म्हणून गिरीश महाजनांची निवृत्ती महाराजांच्या चरणी प्रार्थना
-अजित पवारांनी सांगितली 12 कोटींच्या रेड्याची गोष्ट, उपस्थितांमध्ये एकच हशा…
-2017-18 मध्ये बेरोजगारीच्या दरानं 45 वर्षांचा विक्रम मोडला- बिझनेस स्टँडर्ड
–अजित पवारांचं भाषण सुरु असताना जिल्हाध्यक्षांचं मोबाईलमध्ये तोंड, पुढं काय झालं?
-सोनिया गांधींचे निकटवर्तीय आणि राज ठाकरे यांच्यात 20 मिनिटे चर्चा!