औरंगाबाद | कोरोनाचा धसका सगळ्या जगाने घेतलाय. कोरोनाने सगळीकडे आपले हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाचे 5 रूग्ण सापडले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. एमआयएमपाठोपाठ आता शिवसेनेनेही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये सतर्कता पाहायाला मिळतीये. औरंगाबाद पोलिसांनी उद्या होणाऱ्या शिवजयंतीला आणि कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे. तसंच अनेक शाळांची स्नेहसंमेलने देखील रद्द करण्यात आली आहेत.
फक्त शहरातल्या सर्व शिवरायांच्या पुतळ्यांना अभिवादन करा मात्र कोणत्याही प्रकारची रॅली वगैरे काढू नका, असं आवाहन औरंगाबाद पोलिसांनी केलं आहे. तशी परवानगी देखील पोलिसांची नाकारली आहे.
जर याच काळात औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पार पडली तर लोक एकत्रित येतील आणि धोका निर्माण होईल. दुसरीकडे शासन देखील जास्त मोठ्या प्रमाणात एकत्र जमू नका, असं आवाहन करतंय. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
मुख्यमंत्रिपद अजितदादाच सांभाळतात, खरे मुख्यमंत्री तर…- संदिप देशपांडे
महत्वाच्या बातम्या-
…तर शरद पवारांचाही बाप काढणार का?; गणेश नाईकांचं आव्हाडांना प्रत्युत्तर
#CoronaVirus I ‘त्या’ 11 जणांना घरातून बाहेर पडण्यास मनाई
शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने राऊतांची तंतरली- अमेय खोपकर
Comments are closed.