दगाफटका झाल्यास रस्त्यावर उतरु; मराठा समाजाचा इशारा

औरंगाबाद | मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातील मुद्दे विचारात घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये पार पडलेल्या समन्वयकांच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. 

मराठा आरक्षणाबाबत दगाफटका झाल्यास सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील. मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

मराठा आरक्षणाबाबत सरकार न्यायालयात काय भूमिका घेते? हे पाहून समाजात जनजागृती करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

दरम्यान, आरक्षण, व्यावसायासाठी कर्ज आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी जिल्ह्यात शुक्रवारपासून 10 दिवस मराठा संवाद यात्रेचं नियोजन करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून रोहितला कसोटी सामन्यात न खेळवण्याचा बीसीसीआयचा निर्णय

-मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण की ओबीसींमध्ये समावेश?

-अगोदर खासदारकी सोडा, मग भाजपवर टीका करा; नारायण राणेंना भाजप नेत्याचं आव्हान

-नेहरु यांच्यामुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला!

-ऑनलाईन पेमेंट करणं आता आणखी महाग होणार?