औरंगाबाद महाराष्ट्र

चांगली बातमी | औरंगाबादच्या प्राध्यापक महिलेची 7 दिवसात कोरोनावर मात

Loading...

औरंगाबाद | कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या 59 वर्षीय प्राध्यापिक महिलेची उपचारानंतर चाचणी केली असता तिचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. संबंधित महिलेने सात दिवसात कोरोनावर मात केली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

शहरात एकमेव कोरोनाग्रस्त असलेल्या प्राध्यापिकेवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आता तिची प्रकृती स्थिर असून आम्ही केलेले उपचार यशस्वी ठरले. त्यामुळे सध्या शहरवासीयानांसोबत सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं.

Loading...

शहरातील एका संस्थेत प्राध्यापक असलेली महिला रशिया, कझाकिस्तान येथून जाऊन आली होती. त्यांच्यासोबत आणखी दोघीजण होत्या. त्यानंतर त्या शहरात आल्यावर त्यांचा अहवाल पाझिटीव्ह आला. त्यानंतर प्रशासनाकडून त्यांची तपसणी करण्यात आली.

दरम्यान, प्राध्यापिकेच्या संपर्कात आलेल्या 21विद्यार्थ्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे शहरातील स्थानिक नागरिकांनी डॉक्टरांचं कौतूक केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोना का पंचनामा, म्हणत मोदींनी शेअर केला कार्तिक आर्यनचा व्हिडीओ

50 कोटी रुपयांचे खंडणी प्रकरण : मंगलदास बांदल यांना अखेर अटक

महत्वाच्या बातम्या-

मोदींना शरद पवारांची साथ, टि्वटरवर केली ही विनंती

मुंबईत 27 मार्चपासून पुन्हा जमावबंदी; पोलीस आयुक्तांचे आदेश

आरोग्यमंत्र्यांकडून घरात राहण्याचं आवाहन; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या