औरंगाबाद सेक्स व्हिडीओ प्रकरण, तृप्ती देसाईंनी थेट गृहमंत्र्यांना पाठवले व्हिडीओ
मुंबई | औरंगाबादमधील एका महिला कीर्तनकार आणि पुरुष कीर्तनकाराचा सेक्स व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. 2 मिनिट 54 सेकंदाचा एक व्हिडीओ आणि 27 सेकंदाचा एक व्हिडिओ असे दोन व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी या प्रकरणात थेट कारवाईची मागणी करत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलं आहे. त्याचबरोबर दोन व्हायरल व्हिडीओ देखील पाठवले आहेत.
पुरूष आणि महिला कीर्तनकार यांचा संभोग करतानाचा व्हिडीओ जाणीवपूर्वक बाळकृष्ण मोगल याने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केल्याबाबत सायबर क्राईम कायद्यान्वये 66-A , 67-A आणि IPC 292 अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करावा आणि कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे तृप्ती देसाई यांनी केली आहे.
दोघांनीही विवाहबाह्य संबंध सहमतीने प्रस्थापित करून संभोग करतानाचा पॉर्न व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. असा अश्लील व्हिडिओ हजारो लोकांच्या मोबाईलमध्ये व्हायरल झाला ही गंभीर बाब असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. कीर्तनकार समाजप्रबोधनाचे काम करतात परंतु अलीकडे त्याला बाजारूपणाचे स्वरूप आल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान, सामाजिक भान आणि सोशल नेटवर्कचा दुरूपयोग कसा होतो त्याचे हे उदाहरण आहे. सोशल नेटवर्कपासून तरूण पिढीला वाचवायचं असेल तर सरकारने कंट्रोल आणणं आवश्यक आहे, असं मत देखील तृप्ती देसाई यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
Russia-Ukraine War | ब्रिटनचे पंतप्रधान थेट युक्रेनमध्ये पोहोचले, पाहा व्हिडीओ
विद्यार्थ्यांनो लागा तयारीला; SBI मध्ये पदभरतीची घोषणा
‘अनिल देशमुखांची संपत्ती परत करा’; सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटाकारलं
पाकिस्तानात राजकीय उलथापालथ सुरूच; इम्रान खान यांच्या अटकेची शक्यता
“भाजपचा प्रमुख नेताच केंद्रीय तपास यंत्रणेसोबत राज्यात खेळ करतोय”
Comments are closed.