राष्ट्रवादीने शरद पवारांना दिलेल्या भेटीची एकच चर्चा

औरंगाबाद | राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाची शरद पवार यांच्या सभेने औरंगाबादमध्ये सांगता झाली, मात्र यावेळी राष्ट्रवादीने शरद पवार यांना दिलेल्या भेटीची सध्या एकच चर्चा आहे. 

राष्ट्रवादीने शरद पवार यांना चक्क रुमणे भेट दिले आहे. ज्या कुळवाच्या सहाय्याने शेतकरी शेतीची मशागत करतो, त्या कुळवाला दाब देण्यासाठी रुमण्याचा वापर केला जातो. वेळप्रसंगी त्याच रुमचा वापर बैलांना शिस्त लावण्यासाठीही केला जातो. 

दरम्यान, त्याच धर्तीवर नाकर्त्या सरकारला धडा शिकवण्यासाठी हे रुमणे शरद पवार यांना भेट देण्यात आले आहे, असं धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.