शिवरायांचं बॅनर फाडल्यामुळे औरंगाबादमध्ये तणाव

औरंगाबाद | छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर फाडल्यामुळे शहरात तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे शहरातील मार्केट बंद करण्यात आली असून सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

बॅनर फाडल्याची माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झालेत. तीन जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येतेय.

दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेप्रकरणी अनेक मेसेज व्हायरल झालेत, मात्र या मेसेजवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय. पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने औरंगाबादमध्ये कडेकोट पोलीस बंदोब्सत तैनात केलाय.