बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जेव्हा औरंगजेब येतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज उभे राहतात”

काशी | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काशी दौऱ्यावर आहेत. काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं (Kashi Vishwanath Corridor) लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सभेला संंबोधित करताना अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे. काशी विश्वनाथ धामचा परिसर हा केवळ एक भव्य भवन नाही तर भारतीय सनातन संस्कृतीच प्रतिक आहे. हा परिसर भारताची अध्यात्मिक आत्मा, प्राचिनता आणि परंपरेच प्रतिक असल्याचं यावेळी नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

इथे जर औरंगजेब आला तर तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) उभे राहतात. कोणी सालार मसूद आला तर सुहेलदेव यांच्यासारखे वीर योद्धे आपल्या एकतेची ताकद दाखवून देतात. इंग्रजांच्या काळातसुद्धा काशीच्या लोकांनी हेस्टींगचे काय हाल केले होते, हे तर काशीच्या लोकांना माहिती आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

परकिय आक्रमणांनी या शहरावर हल्ला केला, हे शहर नष्ट करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाच्या अत्याचाराचा, त्याच्या दहशतीचा इतिहास साक्षी आहे. ज्यानं तलवारीच्या बळावर सभ्यता बदलवण्याचा प्रयत्न केला. धर्मांधपणे संस्कृतीला चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या देशाची माती दुनियेपेक्षा काही वेगळी आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

प्रत्येक भारतीयामध्ये ती शक्ती आहे. जी अकल्पनियही सत्यात उतरवते. आम्हाला तप माहिती आहे. तपश्चर्या माहिती आहे. देशासाठी रात्रंदिवस मेहनत करायची आम्ही जाणतो. आव्हान कितीही मोठं असलं तरी आम्ही सर्व भारतीय मिळून परास्त करू शकतो, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. माझ्यासाठी जनता जनार्दन ईश्वराचे रूप आहे. प्रत्येक भारतीय ईश्वराचा अंश आहे. स्वच्छता, आत्मनिर्भर भारतासाठी सातत्याचे प्रयत्न हवे असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा पक्षाला रामराम

“एवढं तरी वाचायला हवं, इतकं बावळट असून चालत नाही”

टेंशन वाढलं! Omicron बाधित रूग्णाचा मृत्यू, खुद्द पंतप्रधानांनी केला खुलासा

अंकिता लोखंडेला आली सुशांतसिंह राजपूतची आठवण; साखरपुड्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल

मनसे-भाजप युती होणार का?, राज ठाकरे म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More