Top News खेळ

“गेल्या 20 वर्षात प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला”

दुबई | ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्जचा हुकुमी एक्का मानल्या जाणाऱ्या शेन वॉटसनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतलाय. निवृत्त स्विकारताना गेल्या 20 वर्षांत प्रत्येक क्षणाचा आनंद लुटल्याने स्वप्नपूर्तीचा आनंद होत असल्याच्या भावना वॉटसनने व्यक्त केल्यात.

वॉटसन म्हणतो, जे स्वप्न पाहिले ते साकारही केलं. यावेळी भरपूर आनंद देखील लुटला. यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली मानतो. हा अध्याय संपवणं कठीण हे, मात्र मी प्रयत्न करतोय. मी एका स्वप्नात जगलो आणि त्यासाठी सर्वांचे आभार मानतो. आता मला पुढच्या प्रवासाची तयारी करायची आहे.

आयपीएलमध्ये दोन वेगवगळ्या संघांकडून खेळताना जेतेपद पटकावणारा वॉटसन एकमेव खेळाडू आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून त्याने जेतेपदाला गवसणी घातली.

संन्यास घेण्याची हीच योग्य वेळ आहे. खेळताना अनेकदा जखमी झालो तरी वयाच्या 39 वर्षांपर्यंत खेळत राहिलो याबाबत स्वत:ला ‘लकी’ समजतो. या प्रवासात माझी सोबत देणारे आईवडील, बहीण निकोल तसंच माझ्या पत्नीचा मी आभारी आहे, असंही त्याने सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

“कांजूरमार्ग कारशेडचं काम थांबवण्याचं भाजपचं कटकारस्थान आहे”

राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं पाप केंद्र सरकार करतंय- सुप्रिया सुळे

“घंटी वाजवली, फोनची लाईटही लावली मात्र मोदींनी…”

‘या’ कारणाने सूर्यकुमारला टीम इंडियात जागा नाही; रवी शास्त्रींनी सोडलं मौन

कंगणा राणावत आणि रंगोलीला मुंबई पोलिसांकडून समन्स; 10 नोव्हेंबरला हजर रहावं लागणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या