Top News खेळ

चेंडू छेडछाडीनंतर हे वाईट कृत्य करताना स्मिथ सापडला रंगेहात; पाहा व्हीडीओ

सिडनी | ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथचा रडीचा डाव पुन्हा एदा समोर आलाय. भारत विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान स्मिथने पिचसोबत छेडछाड केल्याचं समोर आलंय.

भारत विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने 407 धावांचं टारगेट भारताला दिलंय. या लक्ष्याचा पाठलाग करताना पुजारा आणि पंतने चांगली खेळी केली.

यावेळी स्टीव्ह स्मिथने पंतने फलंदाजीसाठी क्रिजवर केलेले मार्क हटवले. स्मिथचा हा प्रकार कॅमेरामध्ये कैद झालाय. यामुळे स्मिथच्या खिलाडीवृत्तीवर पुन्हा एकदा प्रश्चचिन्ह उपस्थित होऊ लागलेत.

2 वर्षांपूर्वी साऊथ आफ्रिकेविरूद्ध स्थिमने सँडपेपरच्या मदतीने बॉल घासला होता. त्यावेळी दोषी आढळल्यानंतर त्याला वर्षभर टीमच्या बाहेर ठेवण्यात आलेलं शिवाय त्याचं कर्णधारपदंही हिरावून घेतलं होतं.

थोडक्यात बातम्या-

इच्छा नसताना दबावामुळे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली; नितीश कुमारांचा खुलासा

भारतीय खेळाडूंवरील वर्णद्वेषी टीकेवरुन सचिन तेंडुलकरचा संदेश, म्हणाला…

कृषी कायद्यांना स्थगिती मिळणार?; शेतकरी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

‘चिकन, अंडी खाणार असाल तर…’; बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन मंत्र्यांचा जनतेला मोलाचा सल्ला

‘फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते, पण…’; शिवसेना नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या