सिडनी | दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा धुव्वा उडवत 51 रन्सनी विजय मिळवलाय. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वनडे सिरीजही स्वतःच्या शिखात घातली आहे.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 390 धावांचे आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावत केवळ 388 रन्सपर्यंत मजल मारता आली.
ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या सिरीजमध्ये 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतलीये. टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने 89 तर केएल राहुलने 76 धावांची झुंजार खेळी केली. मात्र या दोघांचीही खेळी अपयशी ठरलीये.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाज पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर जोश हेझलवूड आणि अॅडम झंम्पाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर हेनरिक्स आणि ग्लेन मॅक्सवेलने 1-1 विकेट घेत भारतावर विजय मिळवलाय.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील हीच काय ती भारताची एकमेव अचिव्हमेंट!
कार्यकर्त्यांमध्ये जात नसते, ज्याला तिकीट पाहिजे असतं त्यांना जात आठवते- नितीन गडकरी
फडणवीसांना नावं ठेवली, आता सत्तेत आहात तर करुन दाखवा- उदयनराजे भोसले
ऑस्ट्रेलियाचा भारतासमोर 389 रन्सचा डोंगर, स्टिव्ह स्मिथचं सलग दुसरं शतक
राज ठाकरे, पवारांची चौकशी लागली, मग दानवे शुद्ध घीवाले आहेत काय?- बच्चू कडू