सिडनी | भारत विरूद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलिया फलंदाजांनी भारताची दाणादाण उडवली. यावेळी ग्लेन मॅक्सवेलने तुफान फलंदाजी करत 19 बॉल्समध्ये 45 रन्स केले. मात्र या खेळीनंतर मॅक्सवेलने केएल राहुलची माफी मागितलीये.
मॅक्सवेलच्या तुफानी खेळीनंतर केएल राहुलला ट्रोल करणारं एक मीम वायरल झालं होतं. यामध्ये, ‘मॅक्सवेलनं आपल्या देशाकडून केलेली तुफानी फलंदाजी पाहाता राहुल.’ असं लिहित एक फोटो पोस्ट करण्यात आला होता.
याला रिट्विट करत जिमी निशीम याने मॅक्सवेलची फिरकी घेतली. तर मॅक्सवेलनेही जिमी निशामला उत्तर देताना म्हटलं की, ‘फलंदाजी करताना मी राहुलची माफी मागितली आहे.’
I apologised to him while I was batting 😂 🦁 🙏 #kxipfriends ❤️
— Glenn Maxwell (@Gmaxi_32) November 28, 2020
आयपीएलच्या तेराव्या सीजनमध्ये मॅक्सवेलला चांगली खेळी करता आली नाही. केएल राहुल कर्णधार असलेल्या किंग्ज इलेव्हेन पंजाबकडून मॅक्सवेल खेळतो.
महत्वाच्या बातम्या-
ठाकरे सरकारने ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’; देवेंद्र फडणवीसांची टीका
“उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही”
ज्यांनी चिरडण्याची भाषा केली ते फार काळ टिकले नाहीत- देवेंद्र फडणवीस
“उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही
“असा अचानक झालेला काळाचा घाला सर्वांना धक्का देणारा आहे”