बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलीय आग; भारतीय कुटुंब लोकांना मोफत खाऊ घालतंय कढी-भात

सिडणी |  ऑस्ट्रेलियाच्या जंगलात भीषण आग लागली असून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. अनेक लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं आहे. तसेच युद्धी पातळीवर मदतकार्य सुरु आहे. अशातच भारतीय वंशाच्या दाम्पत्यानेही मदतीचा हात पुढे करत गरजुंना मोफत अन्न वाटप खाऊ घालणं सुरु केलं आहे.

कंवलजीत सिंह आणि त्यांच्या पत्नी कमलजीत कौर यांनी गरजुंसाठी कढी-भाताची व्यवस्था केली आहे. तसेच ते दिवसांतून 500 कोलांचा स्वंयपाक स्वत: करतात व एनजीओच्या माध्यमातून ही मदत गरजुंपर्यंत पोहोचतात. त्यांची ही मदत अनेकांचा आधार बनली आहे.

शीख दाम्पत्य ऑस्ट्रेलियाच्या पूर्व व्हिक्टोरियाच्या बर्न्सडेल परिसरात ‘देसी ग्रील’ नावाचं हाॅटेल चालवतात. ते सहा वर्षापासून येथे राहत असून मानवतेच्या भावनेतून त्यांनी ही मदत सुरु केली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या जंगलात गेल्या चार महिन्यांपासून आग लागली असून जवळपास 48 कोटी प्राणी आणि पक्षांचा यात जीव गेला आहे. तसेच आतापर्यंत 23 लोकांचा जीव या आगीने घेतला आहे. यावरुन या आगीची भीषणता लक्षात यावी.

ट्रेडिंग बातम्या-

शेतकऱ्याच्या 8 वर्षाच्या मुलीला ‘मातोश्री’वर अशी वागणूक मिळणं दुर्दैवी- देवेंद्र फडणवीस

…त्या शेतकऱ्याचा आवाज थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला; पोलिसांना दिले ‘हे’ आदेश

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More