Top News खेळ

स्मिथ आणि फिंचची दमदार शतकं; ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 375 धावांचं खडतर आव्हान

सिडनी | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामन्यांना आज सुरुवात झाली आहे. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारताला 375 रन्सचं लक्ष्य दिलंय.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी खेळाची सुरुवात उत्कृष्टरित्या केली. आरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरने ओपनिंग जोडी म्हणून चांगली फटकेबाजी केली. यामध्ये फिंचने शतक तर वॉर्नरनेही अर्धशकत झळकावलं.

वॉर्नरच्या विकेटनंतर स्टिव स्मिथने देखील चांगला खेळ केला. स्मिथने अवघ्या 66 चेंडूंमध्ये 105 रन्स ठोकले. ग्लेन मॅक्सवेलनेही 19 चेंडूंमध्ये 45 धावांची खेळी करत धावसंख्या 300 पार करण्यास मदत केली.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतलाय. मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि सुजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट्स घेतल्यात.

महत्वाच्या बातम्या-

आता लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना लोकलमध्ये प्रवेश नाही!

हिंदुत्व सोडायला ते का धोतर आहे?; मुख्यमंत्र्याचा राज्यपालांना टोला

भारतीय नौदलाचं MiG-29K प्रशिक्षण विमान अरबी समुद्रात कोसळलं!

“भगवा उतरवणं सोडा; आधी मुंबई महापालिकेच्या तटबंदीवर डोकं आपटून पहावं”

ईडीचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या