खेळ

पंचांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार पेनला आयसीसीने दिला झटका!

सिडनी | सिडनी येथे तिसऱ्या कसोटी सामन्यात पंचाशी हुज्जत घातल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याला आयसीसीने दंड ठोठावला आहे.

दोषी आढळल्यानंतर तिसऱ्या दिवशी पेनवर कारवाई करण्यात आली आहे. पेनला सामन्याच्या मानधनातून 15 टक्के रक्कम कपात करण्याचा दंड करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम 2.8 नुसार आचार संहिता भंग केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन हा दोषी आढळल्यामुळे सामन्याच्या मानधनातून 15 टक्के रक्कम कपात करण्याचा दंड त्याला ठोठावण्यात आला आहे.

टीम पेनने नियमाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर एक ‘डिमेरिट’अंक त्याच्या अनुशासनात्मक रिकॉर्डमध्ये जोडण्यात आला आहे. पेन याची मागील 24 महिन्यात ही पहिलीच चूक आहे, असं आयसीसीने म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

कृषी कायद्यांना स्थगिती मिळणार?; शेतकरी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

‘चिकन, अंडी खाणार असाल तर…’; बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन मंत्र्यांचा जनतेला मोलाचा सल्ला

‘फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते, पण…’; शिवसेना नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

गरज पडल्यास वेदनाशामक इंजेक्शन घेऊन जडेजा मैदानात उतरणार!

बर्ड फ्ल्यूचा धसका; परभणीत संध्याकाळपर्यंत ‘इतक्या’ हजार कोंबड्या नष्ट करणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या