ऑस्ट्रेलियन कसाेटी कर्णधाराकडून धोनीचं तोंडभरुन कौतुक!

सिडनी | ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेन याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं कौतुक केलं आहे. धोनी हा सर्व फॉरमॅटमध्ये सर्वात बेस्ट यष्टिरक्षक फलंदाज आहे, असं तो म्हणाला आहे.

धोनी हा सर्वाेकृष्ट खेळाडू आहे यात काहीही शंका नाही, हे अगदी खरे आहे. विशेषत: पांढऱ्या चेंडूसह खेळतांना तो आपल्या सर्वांपेक्षा आघाडीवर आहे, असंही तो यावेळी म्हणाला.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सनेही धोनीचे कौतुक केलं आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतही धोनीने आपल्या शांत स्वभावामुळे अनेकदा भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे, असं तो म्हणाला.

दरम्यान, धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2007 चा टी-20  विश्वचषक, 2011 चा विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्राॅफीवर नाव कोरले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-एकदा चार्ज केल्यावर ही वाहने 800 किमीपर्यंत धावणार

-बाॅलिवूडमधील पुरुष नेहमीच जवान राहतात- पूजा भट्ट

-राेहीत शर्माची एकाकी झुंज व्यर्थ, भारताचा एकदिवसीय सामन्यात पराभव

-चौकीदार आता एकालाही सोडणार नाही- नरेंद्र मोदी

-पंड्या- राहूलला ‘कॉफी’ महागात, आगामी विश्वचषक स्पर्धेला मुकणार?