बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लोकांना हॅास्पिटलमध्ये बेड मिळेनात मग संघमालक, सरकार IPLवर प्रचंड पैसा का खर्च करतंय”

मुंबई | देशातील कोरोना रूग्णसंख्येमुळे यंदा आयपीएल सामने होणार की नाही, अशी चिंता क्रिकेटविश्वात रंगली होती. पण बीसीसीआयने वेळेपुर्वी सर्व नियोजन करत अखेर भारतातच आयपीएल सामने खेळवत आहेत. भारतातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहून आयपीएल स्थगित करण्याची मागणी केली जात होती. सरकार, बीसीसीआय आणि फ्रँचायझींचं या काळात आयपीएलवर एवढा खर्च करणे योग्य आहे का, असा सवाल ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्यू टायने केला आहे.

खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार केल्या, आता आम्ही सुरक्षित आहोत, परंतु पुढेही सुरक्षित असू का? पण, भारतीयांच्या नजरेनं विचार केल्यास या काळात फ्रँचायझी, बीसीसीआय आणि सरकार प्रचंड पैसा खर्च करत आहेत, दुसरीकडे येथील लोकांना पैसे नसल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले जात नाही, असं अँड्यू टाय म्हणाला. ऑस्ट्रेलिया व राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज अँड्यू टाय हा आयपीएल 2021 च्या मधून माघार घेणारा पहिला खेळाडू आहे.

वैयक्तिक कारणामुळे त्यानं ऑस्ट्रेलियात परतण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण आयपीएल यूएईत खेळवण्यात आली होती, परंतु यंदा देशातील सहा वेगवेगळ्या शहरांमध्ये आयपीएल सामने खेळवले जात आहेत. कोरोना रुग्ण वाढत असतानाही आयपीएल खेळवणे सुरक्षित आहे का, असा सवाल आता टायनं केला आहे.

दरम्यान, भारतातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहून आयपीएल स्थगित करण्याची मागणी केली जात होती. यातच आता स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यासह 30 ॲास्ट्रेलियन खेळाडूं आयपीएल सोडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! पोलिसाच्या नावे बनावट अकाऊंट उघडुन ढोंग करत मागितली ‘एवढी’ रक्कम

पेटीएमची मोठी मदत, भारताला ‘इतके’ हजार ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर देणार

Renault Triber कारचं नवं माॅडल भारतात लाँच; जाणून घ्या 7 सिटर गाडीचे नवे फिचर्स

मुंबईतील कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने कमी व्हायला सुरूवात; बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिक

…तर मिळणार नाही गॅस सिलेंडर, जाणून घ्या LPG कंपनीनं आणलेला नवा नियम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More