6 चेंडूत लगावले 6 षटकार; ऑस्ट्रेलियाच्या युवा खेळाडूची कामगिरी

6 चेंडूत लगावले 6 षटकार; ऑस्ट्रेलियाच्या युवा खेळाडूची कामगिरी

सिडनी | ऑस्ट्रेलियामधील अंडर 19 नॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धेत एका खेळाडूने 6 चेंडूत 6 षटकार मारले आहेत. ऑलिव्हर डेविस असं या खेळाडूचं नाव आहे. 

न्यू साऊथ वेल्स मेट्रो आणि नॉर्दन टेरीटरी या संघामध्ये सामना खेळण्यात आला. न्यू साऊथ वेल्स मेट्रोकडून खेळताना ऑलिव्हर डेविस याने 40 व्या षटकात 6 चेंडूत 6 षटकार लगावले.

ऑलिव्हर डेविस याने या सामन्यात 17 षटकार लगावले. त्याने या सामन्यात 115 चेंडूत 207 धावा काढल्या. ऑलिव्हर डेविसच्या खेळीमुळे न्यू साऊथ वेल्स मेट्रो संघानं 168 धावांनी विजय मिळवला.

दरम्यान, ऑलिव्हर डेविस न्यू साऊथ वेल्स मेट्रो संघाचा कर्णधार असून तो फक्त 18 वर्षाचा आहे.

https://twitter.com/videos_shots/status/1069553417557688320

 महत्वाच्या बातम्या-

-समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी चक्क घुबडांचा वापर!

-चक्क पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधलेलं घरच गेलं चोरीला!

-शरद पवार आणि नारायण राणेंच्या भेटीवर चंद्रकांत पाटील म्हणतात…

-तुमच्यासाठी कायपण!!! उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्र्यांनी मोडला प्रोटोकॉल

-राजस्थान जिंकण्यासाठी घाम गाळत आहेत आदित्य ठाकरे!

Google+ Linkedin