बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी! दक्षिण आफ्रिकेचा 5 गडी राखून पराभव

मुंबई | आज टी-ट्वेटी विश्वचषकाच्या सुपर 12 सामन्यांना सुरूवात झाली आहे. पहिला सामना हा दोन तगड्या संघात खेळवला गेला. ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेतमध्ये झालेल्या या सामन्यात अखेर ऑस्ट्रेलियाने साऊथ आफ्रिकेवर 5 गडी राखून विजय मिळवला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात विजयी सलामी दिली आहे.

सर्वप्रथम आफ्रिकेने फलंदाजी करत खराब सुरूवात करून दिली. साऊथ आफ्रिकेचा सलामीवीर बावूमा लवकर बाद झाला. त्यानंतर व्हॅन डर ड्यूसेन आणि डिकाॅक देखील झटपट बाद झाले. त्यानंतर क्लासेन आणि मार्करमने सावध फलंदाजी करत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. रबाडाने अखेरच्या काही षटकात फटकेबाजी करत धावसंख्या कशीबशी 118 पर्यंत पोहचवली.

आफ्रिकेने दिलेल्या 119 धावांचं आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात देखील खराब झाली. सलामीवीर डेव्हिड वाॅर्नर आणि अॅराॅन फिंच झटपट बाद झाले. त्यानंतर स्टिवन स्मिथ आणि मार्कस स्टोनिसने अखेरच्या काही षटकात चांगला खेळ दाखवत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

दरम्यान, अखेरच्या काही षटकात नाॅर्जियाने घातक गोलंदाजी करत अफ्रिकेच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, मार्कस स्टोनिसने आक्रमक फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे आता क्वालिफायर फेरीत जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

‘सितारों से आगे जहाँ और भी हैं’; नवाब मलिकांचा शायरीतूून टोला

घटस्फोटानंतर समंथाने केलं तिचं स्वप्न पुर्ण, फोटो शेअर करत म्हणाली…

“आम्ही हिंदुत्वाचे पुराणपुरूष, बाबरी तोडली तेव्हा काखा वर करून पळालो नाही”

‘…म्हणून मी नितीन गडकरींना भेटले’; पंकजा मुंडेंनी सोडलं मौन

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More