खेळ

विराट-पुजारासाठी नाही तर ‘या’ खेळाडूसाठी केलाय गेमप्लॅन- टीप पेन

अ‌ॅडलेड | भारत आणि ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेला उद्यापासून सुरूवात होत आहे. ही मालिका 4 कसोटी सामन्यांची असणार आहे. दोन्ही संघ तगडे असून एक से बढकर एक खेळाडू संघांमध्ये आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने भारताच्या एका खेळाडूसाठी गेमप्लॅन केला असल्याचं सांगितलं आहे.

भारतीय कर्णधार विराट कोहली आणि भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी नाहीतर मराठमोठा खेळाडू आणि भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेसाठी असल्याचं टिम पेनने सांगितलं आहे.

पुजाराने गेल्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती. पण त्याच्याविरोधात रणनिती तयार आहे. पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली मायदेशी परतणार आहे. मात्र गेल्या दौऱ्यात रहाणेनं संघाला जोडण्याचं काम केलं होतं. त्यामुळे यावेळी आमचं सर्व लक्ष रहाणेवर असणार असल्याचं पेन म्हणाला.

दरम्यान, या मालिकेत पहिल्या कसोटीत मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, सलामीची जोडी असणार आहे. तर सराव सामन्यात शतक झळकलेल्या पंतला पहिल्या कसोटीत संधी मिळाली नसून वृद्धिमान साहाला यष्टीरक्षक म्हणून संघात जागा देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाची आठवलेंनी केली ही मोठी भविष्यवाणी

राजू शेट्टी मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील कार्यालयावर काढणार मोर्चा

भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार- जयंत पाटील

आरे वनाविरोधी असलेल्या लोकांना उकळ्या फुटण्याचं कारण नाही- जयंत पाटील

राजकीय पक्ष बाजूला ठेवत आपण ऊसतोड कामगारांसाठी काम करुया- सुजय विखे पाटील

“थुंकू नका लिहिलेलं असलं तरी लोकं तिथेच थुंकतात; ठाकरे सरकारचंही असंच झालंय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या