Saif Ali Khan l अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून चोराने (Thief) त्याच्यावर चाकू हल्ला (Knife Attack) केला. त्याने सैफवर चाकूने सपासप वार केले. सैफला ६ जखमा (Injuries) झाल्या, बराच रक्तस्त्रावही (Bleeding) झाला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफला तत्काळ लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) उपचारांसाठी (Treatment) नेण्यात आले होते.
यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात आली. सध्या सैफची प्रकृती स्थिर (Stable) आहे. अशातच आता ज्या रिक्षातून सैफला रुग्णालयात नेण्यात आले होते, त्या रिक्षाचालकाचा (रिक्षाचालकाचे नाव – भजन सिंह राणा – Bhajan Singh Rana) सत्कार करण्यात आला आहे.
रिक्षाचालक भजन सिंह राणा (Bhajan Singh Rana) यांचा सत्कार :
रिक्षाचालक भजन सिंह राणा यांचा फैजान अन्सारी (Faizan Ansari) यांनी सत्कार केला आहे. तसेच त्यांना ११ हजार रुपयांचे बक्षीस (Reward) दिले. भजन सिंह राणा म्हणाले, “मी माझ्या आयुष्यात कधीच विचार केला नव्हता की असे काही घडेल. मला खूप अभिमान (Proud) वाटत आहे. हा सन्मान (Honour) मिळाल्याने खूप आनंद होत आहे.”
Saif Ali Khan l फैजान अन्सारी (Faizan Ansari) यांच्याकडून रिक्षाचालकाचे कौतुक :
भजन सिंह राणा यांचा सत्कार करणारे सोशल मीडिया इन्फ्लूअन्सर (Social Media Influencer) फैजान अन्सारी यांनी ऑटो ड्रायव्हरला ‘खरा हिरो’ (Real Hero) म्हटले आहे. ते म्हणाले, “मी म्हणेन की खरा हिरो भजन सिंह आहे. त्याने रात्री तीन वाजता अभिनेत्याला रक्ताने माखलेले पाहिले आणि रुग्णालयात नेले. जर त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर तो कदाचित तिथून पळून गेला असता, पण त्याने धाडस (Courage) दाखवले. आज सैफ अली खानला जे दुसरे आयुष्य मिळाले आहे, ते भजन सिंहमुळे आहे, म्हणून मी त्याला मदत करण्यासाठी पुढे येण्याची विनंती करतो.”
या घटनेतून रिक्षाचालक भजन सिंह राणा यांच्या समयसूचकतेचे (Presence of Mind) आणि धाडसाचे दर्शन घडते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
News Title : Auto driver who rushed Saif Ali Khan to hospital felicitated