Top News मुंबई

“पाहिजे तर साऱ्या पोस्ट डिलीट करतो पण मला मारु नका”

मुंबई | राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या जितेंद्र आव्हाड यांचा फोटो एडीट करून ते समाज माध्यमांवर टाकणाऱ्या एकाला त्याच्या अंगरक्षकांनी जबर मारहाण केल्याचा आरोप संबंधित तरूणाने केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते अवधुत वाघ यांनीही आव्हाडांवर निशाणा साधला आहे. भाजपतर्फे आव्हाडांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

जितेंद्र आव्हाड, आजपर्यंत मी तुमच्यावर खूप टीका केली. तुमच्या विरूद्ध खूप पोस्ट टाकल्या. कृपया करून माझ्या घरी पोलिस पाठवू नका. मला मारू नका. पाहिजे तर साऱ्या पोस्ट डिलिट करतो पण 15-20 जणांकडून काठी, बांबू, सळ्यानी मारू नका हो. तुम्ही खूप ग्रेट आहात. झालं?, असं अवधुत वाघ यांनी म्हटलं आहे.

एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, कोरोना राहू द्या, आधी मंत्री आव्हाडांपासून वाचवा! कॉमेंट करणाऱ्या सामान्य ठाणेकर नागरिकाला आव्हाडांच्या उपस्थितीत मारहाण.मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ही `मोगलाई’ का `शिवशाही’, असा सवाल करत  निरंजन डावखरे यांनी आव्हाडांवर टीकास्त्र सोडलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या

जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करा- देवेंद्र फडणवीस

चला चूल पेटवूया; राज्यमंत्री बच्चू कडूंनी दिला स्तुत्य कार्यक्रम

महत्वाच्या बातम्या-

“मुर्खांसोबत सरकार चालवता चालवता अजित पवारांना लोक पण मूर्ख वाटायला लागलेत?”

‘कोरोना’शी लढणाऱ्या ‘देवदुता’चं कर्तव्याला प्राधान्य; आईला ‘व्हिडीओ कॉल’मधून अखेरचा निरोप

ट्रम्प यांची भारताला धमकी; राहुल गांधींचं सणसणीत प्रत्युत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या