अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन

मुंबई | अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. 

मुख्य वनसंरक्षक शेषराव पाटील या समितीचे अध्यक्ष असतील. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य डॉ. बिलाल हबीब, वन्यजीव संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष अनिष अंधेरीया हे समितीचे सदस्य आहेत. तर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितिन काकोडकर हे या समितीचे समन्वयक असतील. 

अवनी मृत्यू प्रकरणी मार्गदर्शक तत्त्वं तसेच स्थायी कार्यप्रणाली योग्य प्रकारे अवलंबण्यात आली किंवा नाही हे ही समिती पाहणार आहे. तसेच शासनाला अहवाल देणार आहे. 

दरम्यान, अवनीच्या मृत्यू प्रकरणी प्राणीप्रेमींसह विरोधक आक्रमक झाले आहे. मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘आणि… घाणेकर’साठी मनसे आक्रमक; खळ्ळ खटॅकचा इशारा

-पुतळ्याचे लॉलीपॉप दाखवणाऱ्यांपासून हिंदूंनी सावध राहावे- उद्धव ठाकरे

-अवनी प्रकरणी नितीन गडकरींची सुधीर मुनगंटीवारांना क्लीन चीट

-युतीसाठी शिवसेनेला हात जोडून विनंती करत आहे- चंद्रकांत पाटील

-बाळा… त्यांना खायला घालू नकोस, अरे ते आपल्या मुंबईचे महापौर आहेत!