या कारणामुळे राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर?

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. यामागील कारणांची देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. 

सुनील तटकरे आणि त्यांचे बंधू अनिल तटकरे यांच्यात मोठा वाद असल्याचं बोललं जातं. मध्यंतरी शरद पवार यांनी या वादात मध्यस्थी देखील केली होती. 

दोन्ही कुटुंबातील वाद अद्याप मिटलेला नाही. त्यातच सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे अवधूत यांनीही स्वतःची तयारी सुरु केल्याचं बोललं जातंय. 

येत्या काही दिवसांमध्ये अवधूत शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. यादृष्टीने त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्लीच्या हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवेंमध्ये खलबतं

-शिवसेनेचा मोठा निर्णय; मध्य प्रदेशमध्ये सर्वच्या सर्व 230 जागा स्वबळावर लढणार!

-महाराष्ट्रात अकलेचा दुष्काळ पडला आहे की काय?; शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

-आज कंदिल घेऊन आलोय, उद्या मशाली घेऊन येऊ; धनंजय मुंडेंचा सरकारला इशारा

-शरद पवार मला पोटच्या मुलासारखं सांभाळतात!

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या