पूनम महाजनांचं काय चुकलं?, भाजपकडून जोरदार समर्थन

मुंबई | भाजप खासदार पूनम महाजन यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर देशभरातून संताप व्यक्त होत आहे, मात्र दुसरीकडे भाजपमधून मात्र त्यांच्या वक्तव्याचं जोरदार समर्थन होताना पहायला मिळतंय.

भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पूनम महाजन यांची चिंता रास्त असल्याचं म्हटलंय. त्यांनी यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट लिहिलीय. 

आपल्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचा मोर्चा मुंबईत ढकला होता. या मोर्चावर पूनम महाजन यांनी नक्षलवादाचा ठपका ठेवला होता.