महाराष्ट्र मुंबई

“ठाकरे सरकार मनसेला घाबरतं, भाजपच्या मोर्चाला परवानगी, आम्हाला का नाही?”

ठाणे | भाजपच्या मोर्चाला परवानगी मिळते, पण मनसेच्या मोर्चाला मिळत नाही, कारण ठाकरे सरकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घाबरतं, अशा शब्दात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

वीज बिलाविरोधात भाजप मोर्चा काढतं, तेव्हा त्याला परवानगी मिळते, मनसे मोर्चा काढतो, त्याला परवानगी देत नाहीत, हा कुठला न्याय? ठाकरे मनसेला घाबरते. हे सरकार उखडून फेकायचं आहे.

काहीही झाले तरी आंदोलन होणार. किती वेळा आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करणार?, असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे.

नितीन राऊत यांनी वीज बिल सवलतीचा निर्णय घेतला, मात्र काँग्रेसला श्रेय मिळू नये, यासाठी शिवसेनेचा डाव आहे. महाराष्ट्रात आंदोलनं होणारच, मला तडीपार करायचं तर करा, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे’; अजित पवारांचं विठूरायाच्या चरणी साकडे

‘क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर हजर राहा’; प्रताप सरनाईकांना ईडीचे समन्स

कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ; पुन्हा आढळले 1 हजारांहून अधिक रूग्ण 

 अंगावर आलात तर…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या