बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अविनाश… आम्ही ठाण्याला येतोय, कोण अडवतंय बघूया- संदीप देशपांडे

मुंबई | अविनाश आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, ठाण्याला येतोय कोण अडवतंय बघूया, असं आव्हान मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिलंय. मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देऊन गुन्हा दाखल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

जेव्हा सरकार आलं तेव्हा हे शिवशाहीचं सरकार असं म्हणालात, पण हे सरकार शिवशाहीचं नाही तर मोघलाईचं आहे. ही हुकूमशाही आम्हाला थांबवू शकत नाही. जिथे चुकाल तिथे प्रश्न विचारु, जिथे अन्याय दिसेल, तिथे मनसैनिकांची लाथ पडणार, असं देशपांडे म्हणालेत

अविनाश जाधव यांना काल तडीपारीची नोटीस तर दिलीच, पण त्यांच्यावर 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्या नर्सेसची कोव्हिडच्या कामासाठी नेमणूक सहा महिन्यांसाठी केली होती, त्यांना अचानक कामावरुन काढून टाकल्याने, अविनाश जाधव यांनी आंदोलन केलं, हा त्यांचा गुन्हा आहे का? सरकारची हुकूमशाही वाढत आहे, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय.

आज आम्ही सर्वजण अविनाश जाधवच्या समर्थनार्थ ठाण्याला जातोय. आम्ही सर्वजण अविनाशच्या पाठिशी आहोत, आम्हाला कोण अडवतंय ते बघायचं आहे, असं आव्हान संदीप देशपांडे यांनी दिलं.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची किंमत अनलिमिटेड- अशोक गेहलोत

वाढदिवस विशेष: तापसी पन्नूचा अभियंता ते बॉलिवूडचा प्रवास वाचून तुम्ही थक्क व्हाल….!

या सरकारचं स्टेअरिंग कुणाच्या हाती?, उद्धव ठाकरेंचं भन्नाट उत्तर

“सरकार मुक्याचे, बहिऱ्यांचे आणि आंधळ्यांचे… मंत्री जणू झपाटलेल्या सिनेमातील कलाकार”

“सध्याचं सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More