Top News

“बिहारमध्ये शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळं आहे का?”

परभणी | बिहार राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे केंद्र सरकार त्या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करतं मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळं आहे का?, असा सवाल काँग्रेस कृषी आणि न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

केंद्र सरकारने जीएसटीतचे पैसे राज्याला दिले नाहीत त्यात शासनाकडेही पैसे नाहीत. मात्र तरीही सरकार 10 हजार कोटी रुपयांची मदत देत आहे. सदर मदत महिन्याभरात शासन शेतकऱ्यांना देणार असल्याचंही विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचं परतीच्या पावसाने मोठं नुकसान झालं असून, शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्याच्या सोबत आहे. या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार का दुर्लक्ष करत आहे, असं कदम म्हणाले.

दरम्यान, आम्ही सत्तेवर आल्याबरोबर 98 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आम्ही सर्वच्या गटाच्या हिताचे निर्णय घेत असून, आमचं सगळं काही सुरळीत चालू असल्याचं कदम यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

अखिलेश यादव यांची भेट घेणारे 7 आमदार बसपामधून निलंबित

“उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा देणं ही वादळापूर्वीची शांतता असू शकते”

‘जान कुमार सानू तुला गर्व असायला हवा….’; जान कुमार सानूच्या समर्थनात धावली ‘ही’ अभिनेत्री

दिवाळीनंतर शाळा, कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा विचार- वर्षा गायकवाड

केंद्राच्या शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसचा 31 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी सत्याग्रह

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या