बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सकाळी उठल्यानंतर तुम्हालाही ‘या’ गोष्टींची सवय असेल तर सावधान! आरोग्यावर होतील विपरित परिणाम

मुंबई | दिवसाची सुरवात अगदी छान झाली की संपूर्ण दिवस आनंदात जातो. त्यासाठी रात्री लवकर झोपुन 8 तास झोप पुर्ण होणं गरजेेेेेेचं आहे. सकाळी उठल्यानंतर अनेक गोष्टी आपण करतो. कोणी व्यायामाला (Exercise) जातं, कोणी सकाळी कोमट लिंबू पाणी पितं, कोणी योगा करतं तर कोणी चक्क खेळायला जातं.

अनेकांना उठल्यानंतर तिथेच पडून राहण्याची देखील सवय असते. अंथरूणात पडून राहण्याची सवय तुम्हाला आळस निर्माण करण्यास मदत करू शकते आणि संपूर्ण दिवस जांभई देण्यात निघून जाऊ शकतो. त्यामुळे या सवयी पासून लांब रहा. सकाळी उठल्या उठल्या कोणत्यातरी कारणाने आपली भांडण होतात त्यामुळे सकाळ सकाळी भांडण शक्यतो टाळत जा. यामुळे दिवसभर तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा (Energy निर्माण होऊन दिवस छान जाण्यास मदत होईल.

सकाळ सकाळी बेड टी किंवा काॅफी (Coffee) पिण्याची सवय असते. तज्ज्ञाच्या मते सकाळी काॅफी किंवा चहा पिल्याने काॅर्टिसोल या हार्मोनचे प्रमाण वाढते. त्याचप्रमाणे सकाळी नाष्टा केल्याशिवाय बाहेर पडणं म्हणजे पोटावर अन्याय करणं होय. त्यामुळे सकाळी नाष्टा करत जा. नाष्टा करताना तो पौष्टीक आणि हलका असावा याची काळजी घ्या. नाष्टा जास्त तिखट नसावा यामुळे दिवसभर अपचन होत नाही.

दरम्यान, सकाळी उठल्यानंतर केलेल्या गोष्टींचा, आपल्या कामाचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि दैनंदिनीवर होत असतो. त्यामुळे अशा काही बॅड हॅबिट्स (Habits) तुम्ही सकाळी करत असाल तर लगेच बंद करा. सकाळी चांगल्या गोष्टीचा अवलंब करा.

थोडक्यात बातम्या

शिवसेना फोडल्याचं श्रेय फडणवीसांनी घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंनाच – राज ठाकरे

“दोन मंत्र्यांचं सरकार कोसळणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार”

“संजय राऊत बेरोजगार आणि उद्धव ठाकरे घरीच बसून असतात”

शिंदे गट मनसेत विलीन होणार?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

पाचव्या मजल्यावरून चिमुकली थेट खाली, देवासारखा आला तरूण; चित्तथरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More