महाशिवरात्रीला ‘दुप्पट’ खाणं टाळा; जाणून घ्या उपवासाचा खरा अर्थ आणि फायदे

Avoid  Double  Eating on mahashivratri vrat 

Mahashivratri Vrat | ‘उपावृत्तस्य पापेभ्यम सहवासो आत्मनो हि यः। उपवासः विद्वने न शरीरस्य शोषणम !!’ या श्लोकात उपवासाचा अर्थ सांगितला आहे – ‘उप’ म्हणजे जवळ आणि ‘वास’ म्हणजे राहणे. अर्थात, देवाच्या जवळ राहणे म्हणजे उपवास. उपवासाच्या दिवशी अधिक खाणे किंवा अजिबात न खाणे, या दोन्ही गोष्टी टाळाव्यात. (Mahashivratri Vrat)

उपवासाचे फायदे

आपल्या भारतीय संस्कृतीत उपवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक सण, ऋतू आणि उपवासाचा संबंध आहे. ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ मानले जाते. त्यामुळे, सकस आहार घेणे जसे महत्त्वाचे आहे, तसेच शरीर आतून स्वच्छ करणे आणि ऊर्जा देणेही आवश्यक आहे. यासाठी उपवास हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. निसर्गाप्रमाणेच शरीरालाही बदल हवा असतो. उपवासामुळे शरीराला नावीन्य आणि ऊर्जा मिळते.

एकादशी आणि उपवास

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi), महाशिवरात्री (Mahashivratri), रामनवमी (Ramnavami), हरतालिका, श्रावण महिना, नवरात्र अशा व्रतांमध्ये उपवासाचे महत्त्व आहे. जेव्हा ही व्रते येतात, तेव्हा निसर्गात मोठे बदल होत असतात. एक ऋतू संपून दुसरा ऋतू येत असतो. अशावेळी, शारीरिकदृष्ट्या नवीन बळ घेऊन बदलत्या ऋतूंना सामोरे जाण्यासाठी उपवास करावा.

उपवासाला काय खावे?

उपवास करताना, आपली दिनचर्या लक्षात घ्यावी. शरीर रचनेनुसार किती आहार लागतो, हे समजून घेणे आवश्यक आहे. उपवासाच्या दिवशी खूप खाणे किंवा अजिबात न खाणे, या दोन्ही गोष्टी टाळाव्यात. खाण्यासाठी योग्य पदार्थांची निवड करावी. ज्यांना उपवास सहन होत नाही, त्यांच्यासाठी भगर आणि रताळे उत्तम आहेत. भगरीमध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस मुबलक असते. त्यामुळे ती पचायला हलकी असते. वजन कमी होण्यास, हाडांना मजबुती मिळण्यास, ऊर्जा पातळी वाढण्यास आणि मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी भगर हे एक परिपूर्ण अन्न आहे. रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ते उकडून खाल्ल्यास पोषक मूल्ये टिकून राहतात. उपवासाला साबुदाणा शक्यतो टाळावा, कारण तो पचायला जड असतो.

उपवासाचा खरा अर्थ

उपवास म्हणजे, मन आणि शरीर स्वच्छ करून नवीन ऊर्जा मिळवणे. उपवास शक्यतो पाण्यावर करावा किंवा फळे खावीत. फळांमध्ये नैसर्गिक साखर (ग्लुकोज) असल्याने शरीराला ताकद मिळते. उपवासामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि विविध आजारांना प्रतिबंध होतो. प्राणीमात्रांमध्ये, जेव्हा कुणी आजारी पडते, तेव्हा ते अन्नाचा कणही घेत नाहीत आणि काही काळात बरे होतात. उपवास हे निसर्गाने दिलेले एक वरदान आहे. (Mahashivratri Vrat)

उपवासाच्या दिवशी काय करावे

उपवासाच्या दिवशी घरात साबुदाणा, बटाटे, रताळे, बटाटा पापड, बटाटा किस, तळलेले शेंगदाणे, उपवासाचे थालीपीठ, दाण्याची आमटी, चिप्स, ड्रायफ्रूट, भगर, मिल्कशेक असे अनेक पदार्थ बनवण्याची लगबग असते. इथेच आपण चुकतो. उपवास हा एक संस्कार म्हणून न घेता, त्याला सणाचे रूप देतो.

 Title : Avoid  Double  Eating on mahashivratri vrat 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .