‘या’ चुका टाळा नाहीतर खात्यातील पैसे क्षणार्धात होतील गायब

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सध्या ऑनलाईन व्यवहारांचं(Online Payment) प्रमाण वाढलं आहे. परंतु या वाढत्या व्यवहारांसोबत गैरव्यवहारांचेही प्रमाण वाढलं आहे. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत की, ग्राहकांच्या खात्यातील पैसे हॅकर्सने क्षणार्धात गायब केले आहेत.

ऑनलाईन व्यवहार करताना तुम्हाला देखील हॅकर्सची भीती वाटत असले, तर तुमच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे. आपण काही अशा गोष्टी जाणून घेऊयात ज्या ऑनलाईन व्यवहार करताना टाळल्या पाहिजेत.

तुम्ही जेव्हा ऑनलाईन खरेदी करत असता अशावेळी हॅकर्स तुमच्या बॅंकेची डिटेल्स जतन करून ठेवण्याची शक्यता असते. त्यामुळं तुम्ही ऑनलाईन खरेदी करताना अधिकृत वेबसाइटवरूनच करा.

हॅकर्स अनेकदा तुम्हाला कर्ज देण्याच्या, केवायसी करण्याच्या नावखाली तुम्हाला काॅल करून ओटीपी मागतात. किंवा पैशांचे आमिष दाखवून एखाद्या लिंकवर क्लिक करण्यास मजबूर करतात. त्यामुळं कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी ती लिंक कशाची आहे, हे एकदा तपासून पाहा.

तसेच सेफ्टीसाठी तुम्ही इतर कोणच्यातरी मोबाईलमध्ये, लॅपटाॅपमध्ये ऑनलाईन बॅंकींगचे अॅप लाॅगीन करणं टाळलं पाहीजे. तुमची ही चुक देखील तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळं हॅकर्सपासून वाचण्यासाठी सर्वांनी जागरूक राहणं गरजेचं आहे.

महत्वाच्या बातम्या-