देश

12 वी उत्तीर्ण तरूणांसाठी खूशखबर; नौदलात इतक्या जागांची भरती!

मुंबई | बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नौदलात कार्यालयीन कामकाज करण्याची संधी मिळणार आहे. द इच्छुकांना 18 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील, अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे. नौदलातील जवानांना विविध वस्तू पुरविण्यासह कार्यालयीन कामाकाजासाठी ही पदे भरण्यात येणार आहेत.

आर्टिफिशिअल अ‌ॅप्रेंटिस विभागात 500, तर वरिष्ठ माध्यमिक भरती विभागात 2 हजार200 पदं भरण्यात येणार असल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली. तसंच ऑगस्ट 2020 च्या तुकडीसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आर्टिफिशिअल अ‌ॅप्रेंटिस विभागात 20, तर वरिष्ठ माध्यमिक भरती विभागात 15 वर्षांसाठी या नियुक्ती करण्यात येणार आहेत.

https://www.joinindiannavy.gov.in/ या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन नौदलामार्फत करण्यात आलं आहे. 14 हजार 600 रुपये आणि इतर भत्ते देण्यात येणार आहेत.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्यात येणार असून उमेदवारांना ईमेल आणि संकेतस्थळाद्वारे याबाबतची माहिती कळवण्यात येणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या