बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुक्त गाव करणाऱ्या ग्रामपंचायतींना देणार पुरस्कार

जालना | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत वाढणारी कोरोना रुग्णसंख्या ही आता हळूहळू आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

जालना जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या ग्रामपंचायतींची माहिती घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून तीन ग्रामपंचायतींना कोरोनामुक्त झाल्याबद्दल पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज केली आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती.

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जनजागृती गरजेची असल्याचे मत  राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. तसेच यासाठी ग्रामपंचायतींना प्रोत्साहन मिळावं म्हणून ग्रामपंचायतीने कोरोनामुक्त झाल्यास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, प्रत्येक तालुक्यातून तीन ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार असून ही निवड करताना ग्रामपंचायत क्षेत्रातील लसीकरणाला 80 गुण, कोरोना चाचण्यासाठी 10 गुण तसेच मास्क व सामाजिक अंतर ठेवणे यासाठी 10 गुण अशाप्रकारे निकष ठरवण्यात आले आहेत.

 

थोडक्यात बातम्या –

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More