बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रेयसीला पाहण्यासाठी तरूणाने केला अजब जुगाड, पाहा व्हिडीओ

लखनऊ | एखादा व्यक्ती प्रेमात पडला की तो कोण्यातही गोष्टी करायला लागतो. त्याच्या डोळ्यांना त्याच्या प्रेमाशिवाय इतर कोणत्याच गोष्टी दिसत नाहीत. त्या व्यक्तीसाठी आपला जीवही धोक्यात घालण्यासाठी तयार असतो. सोशल मीडियावर अधून-मधून या संदर्भातील वेगवेगळ्या बातम्या आपल्या कानावर पडत असतात. त्यातील काही तर खूपच मजेशीर असतात.

अशातच उत्तप्रदेशमधील भरोही जिल्ह्यामध्ये एक विचित्र प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी चक्क एका तरूणाने नवरीचा साज घातला आहे. तरूण नवी-नवरी होऊन आपल्याच प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. तरूणाच्या या धाडसाची सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली आहे.

तरूण नवरीच्या वेशात आपल्या प्रेयसीच्या घरात शिरला. कोणी तरी मैत्रीण भेटायला आली असेल. या विचाराने त्यावेळी त्याकडे घरातील सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. परंतू नंतर संशय यायला लागल्याने त्याच्या डोक्यावरील पदर बाजूला केला असता. तो स्त्री नसून एक पुरूष असल्याचं समजलं. त्यानंतर त्या तरूणाला घरातील व्यक्तीने मारहाण करायला सुरूवात केली.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये त्या तरूणाला चारही बाजूने त्याच्या प्रेयसीच्या घरातल्यांनी घेरलं आहे. व्हिडीओमध्ये त्यातील काहीजण त्याला मारत असल्याचंही पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात टाळेबंदी, संभाजीराजेंना मोठा धक्का!

भर मंडपात नवरीने केलं असं काही की…; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

हॅाटेलच्या रुममधून येत होता पत्नीचा आवाज, मात्र पतीनं पकडताच केला धक्कादायक खुलासा

षटकारांचा बादशाह मात्र अजूनही संधी नाही, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूनं दिली खेळ सोडण्याची धमकी

मे महिन्यात महाराष्ट्रात मृत्यूतांडव, दर तासाला झाले इतके मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More