बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भयंकर ! धुम्रपान करतानाच गाडीत सॅनिटायजर वापरलं; अन् झालं असं काही…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | कोरोनाकाळात वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व वाढलं आहे तसंच लोक कोरोना संसर्गापासून बचावासाठी सॅनिटायजर, मास्कचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत. सॅनिटाजर वापरतेवेळी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जर योग्य काळजी घेतली नाही तर मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. अशीच एक घटना समोर आली आहे. अल्कोहोलमुळे असं काही झालं असेल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही.

न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी एका कारमध्ये हॅण्ड सॅनिटायजरचा वापर केल्यामुळे आग लागली आहे. अमेरिकेच्या Maryland मधून ही घटना समोर आली आहे. Montgomery County Fire and Rescue Service ने दिलेल्या माहितीनुसार हॅण्ड सॅनिटायजर वापरताना ही आग लागली. यावेळी सोबतची व्यक्तीसुद्धा स्मोकिंग करत होती. त्यामुळे कारमध्ये भयंकर आग लागली. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान  व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक जळती कार दिसून येत आहे. कार चालकाला कसंबसं कारच्या बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवण्यात आलं. सध्या या माणसावर उपचार सुरू आहेत. सॅनिटायजरमध्ये एथेनॉल किंवा isopropanol हा ज्वनलशील पदार्थ असतो. म्हणून वापर करताना काळजी घेणं गरजेचं आहे. याआधीसुद्धा असाच प्रकार घडला होता.

दरम्यान, एका महिलेनं मेणबत्ती लावत असताना सॅनिटायजरचा वापर केला होता. त्यावेळी आग लागल्यानं या महिलेची त्वचा संपूर्ण जळाली होती.

थोडक्यात बातम्या – 

हास्यास्पद ! पावसात रस्त्याच्या कडेला मोबाईल पाहत जात होता; अन् घडलं असं काही…, पाहा व्हिडीओ

राजीव सातव यांचं निधन कोरोनाने नाही तर ‘या’ विषाणुमुळे?; काय आहे ‘सायटोमॅजिलो’?

भारतीय संघाच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाचा कसोटी, वन-डे मधुन निवृत्तीचा विचार?

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट, पण मृतांचा आकडा चिंताजनक

महाविकास आघाडीतील मंत्रीच सरकारवर संतप्त, दिला आंदोलनाचा इशारा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More