Ayesha Jhulka | मनोरंजन सृष्टीत साहसी किंवा कठीण दृश्यांची गरज भासत असते, जिथे अनेकदा बॉडी डबल्सचा वापर होतो. पण कधी कधी ही दृश्ये कलाकाराच्या परवानगीशिवाय शूट केली जातात, आणि त्यामुळे कलाकारांना नंतर पश्चाताप करावा लागतो. असाच अनुभव अभिनेत्री आयेशा झुल्का (Ayesha Jhulka) यांनी ‘दलाल’ चित्रपटाच्या संदर्भात शेअर केला आहे.
मिथुनसोबत केलेल्या चित्रपटाचा झाला पश्चाताप-
१९९०च्या दशकात आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या आयेशा झुल्काने (Ayesha Jhulka) आपल्या करिअरची सुरुवात सलमान खानसोबतच्या ‘कुर्बान’ या चित्रपटातून केली. ‘जो जीता वही सिकंदर’ (1992), ‘खिलाडी’ (1992), ‘मेहरबान’ (1993) यांसारख्या चित्रपटांतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
View this post on Instagram
तिने प्रकाश मेहरा (Prakash Mehra) निर्मित आणि पार्थो घोष (Partho Ghosh) दिग्दर्शित ‘दलाल’ या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्यासोबत काम केलं. सुरुवातीला शूटिंग सुरळीत सुरू असताना नंतर आयेशाला कळलं की तिच्या परवानगीशिवाय एका बलात्कार प्रसंगात बॉडी डबल वापरून दृश्य शूट करण्यात आलं.
सत्य समजल्यावर आयेशाला धक्का-
या घटनेबाबत सांगताना आयेशा (Ayesha Jhulka) म्हणाली, “माझ्या नकळ माझ्यावर बलात्कार होत असलेला प्रसंगाचा सीन शूट केला गेला. मी त्या सीनबाबत पूर्ण अंधारात होते. इतकंच नाही, तर ट्रायल शोसाठी देखील मला बोलावण्यात आलं नव्हतं.”
या सीनबाबतची माहिती एका पत्रकाराकडून मिळाल्याचं आयेशा म्हणाली. “त्या पत्रकाराने मला विचारलं, ‘तुला या सीनबाबत माहिती आहे का? आम्हाला खूप आश्चर्य वाटतंय की तू हे कसं मान्य केलं?’ कारण सर्वांनाच माहिती होतं की तो बॉडी डबल होता,” असं ती म्हणाली.
प्रकाश मेहरांकडून सत्य लपवण्याचा आरोप-
या वादग्रस्त दृश्यावर प्रतिक्रिया मिळवण्यासाठी आयेशा झुल्काने प्रकाश मेहरांना फोन केला. मात्र, त्यांच्या उत्तरांनी ती आणखी संभ्रमात पडली. “प्रकाश मेहराजींनी मला सांगितलं की अशा प्रकारचं काहीच दृश्य चित्रपटात नाही. मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, कारण मी पाहिलेल्या ट्रायलमध्ये तो सीन नव्हता,” असं तिने सांगितलं.
पुन्हा काही दिवसांनी तोच पत्रकार तिला संपर्क करून प्रेससाठी होणाऱ्या दुसऱ्या ट्रायल शोची माहिती देतो. आयेशा त्याला अनाहूतपणे उपस्थित राहते आणि त्या सीनला स्वतः पाहते. “तो सीन पाहून मी खूप संतापले आणि फसवणूक झाल्याची भावना आली. दुसऱ्याच दिवशी मी इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशनमध्ये (IMPPA) तक्रार दाखल केली,” असं तिने स्पष्ट केलं.
चित्रपटातून दूर गेल्यानंतर पुन्हा केले कमबॅक
या प्रकारानंतर आयेशा झुल्का अभिनय क्षेत्रातून काही काळ लांब राहिली. 2000 च्या दशकात तिने अपेक्षित भूमिका न मिळाल्यामुळे ब्रेक घेतला. मात्र, 2018 मध्ये ‘जिनियस’ चित्रपटातून ती पुन्हा मोठ्या पडद्यावर आली. त्यानंतर तिने ‘हश हश’ (2022) आणि ‘हॅपी फॅमिली: कंडिशन्स अप्लाय’ (2023) या अॅमेझॉन प्राइमवरील वेबसिरीजमध्येही काम केलं. अलीकडेच ती ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या रिअॅलिटी शोमध्येही झळकली.