बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दोन मोठी माणसं बोलताना आपलं तोंड मिटून ठेवावं”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद वाढताना दिसत आहे. आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी अमोल मिटकरींवर सडकून टीका केली आहे.

राजसाहेबांवर मिटकरीसारख्या बगलबच्च्यांनी टीका वगैरे करणं म्हणजे निव्वळ पोरकटपणा आहे. दोन मोठी माणसं बोलत असताना आपलं तोंड मिटून ठेवावं हे एका राष्ट्रीय म्हणवणाऱ्या पक्षाच्या नेत्याला कळू नये, हे केवढं मोठं दुर्दैव आहे, अशी टीका अमेय खोपकर यांनी केली आहे.

आत्ता कुठे मिसरुड फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने राजसाहेबांचं नुसतं नाव उच्चारतानाही दहावेळा विचार करायला हवा, असं अमेय खोपकर म्हणालेत. त्यांनी या संदर्भात एक फेसबूक पोस्ट केली आहे.

दरम्यान, मिटकरींनी केलेल्या या टीकेला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंवर टीका करू नये, त्यांची तेवढी लायकी नाही. राष्ट्रवादीचं नाव असणारा पक्ष महाराष्ट्रात अतिश्य संकुचित आणि जातीपातीचं राजकारण करत आहे. मनसेला त्यांच्याकडून शिकायची गरज नाही. राज्यात जातीपातीचं विष पेरणारे हे लोक महाराष्ट्रद्रोही असल्याचंही संदीप देशपांडे यांनी म्हटलंय.

 

थोडक्यात बातम्या- 

“…आता थांबणं शक्य नाही, शेतकऱ्यांनो पायातलं हातात घ्या”

सख्खा भाऊ पक्का वैरी!, अश्रफ घनींचा भाऊच तालिबान्यांना मिळाला!

“राज ठाकरेंनी बाबासाहेब आंबेडकरांचं ‘एनिहिलेशन ऑफ कास्ट’ पुस्तक वाचावं”

आम्हा बारामतीकरांना भल्या सकाळी काम सुरू करायची सवय लागलीये- अजित पवार

बॅालिवूड हादरलं, सेक्स रॅकेट प्रकरणात अभिनेत्री आणि मॉडेलला अटक.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More