देश

“राम मंदिर हजारो वर्ष टिकणार, बड्या भूकंपानांही मंदिर सहजपणे तोंड देईल”

अयोध्या | अयोध्येतील राम मंदिर हजारो वर्ष सहजपणे टिकेल अन् बड्या भूकंपानांही सहजपणे तोंड देईल. अशा पद्धतीनं मंदिराचं बांधकाम करण्यात येणार आहे, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली आहे.

माध्यमांशी बोलताना चंपत राय म्हणाले की, देशातील मोठमोठ्या नद्यांवरील पुलांच्या खांबांप्रमाणेच राम मंदिराचे खांब देखील मजबूत असणार आहेत. खोलवर पाया खणून राम मंदिर उभारलं जाणार असल्यानं तगड्या भूकंपातही मंदिरावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही.

तसेच मंदिराचे बांधकाम करत असलेल्या लार्सन अॅन्ड टुब्रो कंपनीच्या अधिकारींची भेट झाली असून मंदिराच्या पायाचा नकाशा अंतिम टप्प्यात आला आहे, असंही चंपत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

दरम्यान कंपनीकडून अंतिम नकाशा हाती लागला की ट्रस्टकडून हा नकाशा अयोध्या विकास प्राधिकरणाकडे मंजूरीसाठी सोपविला जाईल. यासाठी जो काही खर्च लागेल तो सर्व ट्रस्ट भरणार आहे, असंही चंपत यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“ज्यांचं नाव वापरून सत्तेत आलात त्यांचा हाच पुतळा तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही”

बारामतीत ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी…., अजितदादांच्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना

प्रवीण दरेकर यांचा मुंबई महानगरपालिकेवर गंभीर आरोप, म्हणाले…

अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या