बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी तज्ज्ञांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागितली मदत

मुंबई | कोरोनाच्या रुग्णांवर उपचारांसाठी होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी या क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शक सूचना तयार करुन टास्क फोर्सकडे द्याव्या. जेणेकरून एकात्मिक औषधोपचार देऊन रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध पॅथींचे तज्ज्ञ आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासनाने नेमलेल्या टास्क फोर्सच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जातायत. आयुषच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी देखील राज्य शासनाने समिती नेमलीये.

आयुषमधील औषधांची प्रतिबंधात्मक आणि उपचारासाठी अशा दोन भागात विभागणी करून तज्ज्ञांनी त्या संबंधी उहापोह करावा आणि टास्क फोर्सकडे सर्वसमावेशक सूचना सादर कराव्यात जेणे करून त्या कोरोना रुग्णांच्या उपचारात उपयुक्त ठरतील. कोरोनाच्या या परिस्थितीत आर्युवेद, युनानी यांचं महत्त्व जगाला पटवून देण्याची संधी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

यावेळी विविध तज्ज्ञांनी आपले मते मांडली. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आयुष उपचारासाठीच्या समितीचे अध्यक्ष डॉ. तात्याराव लहाने, मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, निमा, आय एम ए, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

गलवानमध्ये शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांची पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी

Chutia लिहिल्यानं स्वीकारला जात नव्हता नोकरीचा अर्ज, अखेर तरुणीनं उचललेल्या पावलानं घडला चमत्कार!

श्रावण महिना सुरू झालाय आता…; चंद्रकांत खैरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र!

महाराष्ट्रात पुन्हा जिम, शॉपिंग मॉल सुरु करण्याचा सरकारचा विचार- राजेश टोपे

6 वेळा विधानसभा, 1 विधानपरिषद, 7 लोकसभा, दोनदा राज्यसभा; शरद पवारांनी घेतली सोळाव्यांदा शपथ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More